धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक युनिट क्र. 1 व खामसवाडी येथील श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक युनिट क्र. 2 या दोन्ही गुळ कारखान्यांकडून हंगाम 2024-25 मधील ऊस बिलाचा 200 रुपयांचा अंतिम हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
संस्थापक अध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच शेतकरीहिताला प्राधान्य देत पारदर्शक कारभार राबविला जातो. हंगामातील उर्वरित हप्ता बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर वेळेत देण्याचे आश्वासन यापूर्वी दत्ता कुलकर्णी यांनी दिले होते. त्यानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी करत शेतकऱ्यांच्या खात्यावर अंतिम 200 रुपयांचा हप्ता जमा झाल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी जलद पेमेंट व्यवस्था हीच आमची ताकद आहे.मागील हंगामात सव्वादोन लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्या आले होते. याचा अंतिम हफ्ता जमा केला आहे तर पुढील हंगामातही पारदर्शक व विश्वासार्ह कारभार ठेवून आगामी काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हेच उद्दिष्ट असून श्री सिद्धिविनायक परिवाराकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला.