धाराशिव (प्रतिनिधी)- पद्मश्री चेतराम पवार धाराशिव येथे स्वदेशी जागरण मंच व स्वावलंबी भारत गटाकडून कौटुंबिक स्वरूपात हृदय सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना चैत्राम  म्हणाले, भारतीय शेती विकासासाठी सेंद्रिय शेती गट शेती करून सुपोषणाची चळवळ सुदृढ केली पाहिजे. सर्व समाज घटकाने स्वदेशीचा वापर करून भारताची अर्थव्यवस्था दुरुस्त करण्याचे आवाहन केले. धाराशिव येथील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन या संकटाचे आयोजन केले. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी स्वदेशी जागरण मंच व स्वावलंबी भारतचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चैत्राम पवार यांची साधी राहणी व कृतिशीलता,तत्परता पाहून सर्व सामान्यातूनच असे असामान्य घडतात हे प्रकर्षाने चालवले.

 
Top