भूम (प्रतिनिधी)- ग्रंथपालांचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पाथरूड येथे भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अशोक मोहेकर, कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सूर्यकांत जगदाळे, तसेच विद्या विकास मंडळ पाथरूडचे सहसचिव सचिन श्री मुरलीधर काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या प्रसंगी शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष शिंदे, संस्था पदाधिकारी उत्तर बोराडे, महाविद्यालयाचे प्राध्यापकवर्ग व ग्रंथपाल हारी महामुनी यांची उपस्थिती होती. ग्रंथप्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तके, संदर्भग्रंथ व माहिती स्रोतांचे अवलोकन करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय विभागामार्फत करण्यात आले.