भुम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील बराणपुर येथे घाडगे वस्ती जगदाळे वस्ती दरेकर करडे वारे वस्ती रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे पावसाच्या दिवसात गावातील शालेय विद्यार्थी दुग्ध व्यवसायिक शेतकरी व शेतकऱ्यांच्या नागरिकांना रहदारी करताना चिखलमय रस्त्याचा सामना करावा लागत होता. रस्त्यात चिखल व पाणी होत असल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणी निर्माण होत होती त्यामुळे येथील नागरिकांची माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्याकडे रस्त्याची दुरुस्तीची मागणी होती.
माजी मंत्री तथा आमदार डॉ तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व भैरवनाथ उद्योग समूहाच्या वतीने स्वखर्चातून बराणपुर येथे रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता मजबुती करण्याचे आदेश देण्यात आले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी उपसभापती बालाजी गुंजाळ, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चना दराडे,शिवसेना वैद्यकीय जिल्हाप्रमुख पांडुरंग धस,गोरमाळा सरपंच अतुल शेळके, उळूप सरपंच विनोद वरळे, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर अर्जुन, यांच्या हस्ते रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी शेतकरी दत्तात्रय जगदाळे माजी सरपंच सुनील घाडगे, मा. सरपंच विलास पाटील, काकासाहेब पाटील,नितीन पाटील, अजित पाटील,राहुल करडे,प्रदीप शेलार,संदीप वारे, बालाजी वारे,प्रशांत पाटील श्रीराम कर्डे अश्रुबा वारे भीमराव घाडगे, किरण पाटील धनंजय पाटील राजाभाऊ करडे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बऱ्हाणपूर मधील गावातील रस्त्याचे काम मार्गी लावल्यामुळे ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे ग्रामस्थांच्या वतीने आमदार तानाजी सावंत यांचे आभार व्यक्त करण्यात आले.