तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक तीक्षेवि-2024/प्र.क्र.77/का.1444(अ) दि.28/05/2025 नुसार एकुण 1865 कोटीच्या श्री.तुळजाभवानी मंदिर विकास आराखडयास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुषंगाने श्री.क्षेत्र तुळजाभवानी मंदिराजवळील अंदाजित 22558 चौ.मी. येवढी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करावयाची आहे. 

तरी जागा/इमारत संपादित होणाऱ्या मालक/भोगवटादार धारकांचे सामाजिक व आर्थिक  सर्वेक्षण करणे करिता एकुण 05 पथक तयार करण्यात आले आहेत. सदरील पथक मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या उपकेंद्रातील विद्यार्थी,नगर परिषद कर्मचारी, मंदिर संस्थान कर्मचारी तसेच तहसिल कार्यालयातील कर्मचारी यांचा समावेश आहे. 

सदरील सर्वेक्षण करताना संपूर्ण व्हिडिओ ग्राफी केली जाणार आहे.सदरील सर्वेक्षण दरम्यान संबंधीत लोकांनी आपली सर्वेक्षणातील सर्व माहिती पुरवावी.तसेच याबाबत कोणाच्या काही शंका असतील तर त्यांनी श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापूर या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

 
Top