धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीची नूतन जिल्हा कार्यकारणी देवगिरी प्रांत मंत्री युवराज नळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली, 

ती पुढील प्रमाणे.-अध्यक्ष भागवत घेवारे, कार्यवाह रवींद्र शिंदे, उपाध्यक्ष कविता पुदाले व संजय कोथळीकर, कोषाध्यक्ष प्रशांत गुरव, संघटन मंत्री भैरवनाथ कानडे, प्रसिद्धीप्रमुख शंकर खामकर व अश्रुबा कोठावळे, मार्गदर्शक राजेंद्र अत्रे, डॉक्टर अभय शहापूरकर, प्राचार्य प्रशांत चौधरी, महिला प्रतिनिधी सुनीता गुंजाळ कवडे, युवा प्रतिनिधी अविनाश मुंडे, युवती प्रतिनिधी ऍडव्होकेट द्वारका देवळे, वाचक प्रतिनिधी सुरेश शेळके, कार्यकारणी सदस्य प्रा डॉ दीपक सूर्यवंशी, डॉ बालाजी इंगळे, हनुमंत पडवळ, सहदेव रसाळ, डॉ अस्मिता बुरगुटे, ॲड जयश्री तेरकर, अपर्णा चौधरी, मीना महामुनी, सुरेखा जगताप कदम, रेखा सुरेश कदम.

    अखिल भारतीय साहित्य परिषद ही नामांकित व प्रतिभावान कवी तथा माजी पंतप्रधान कै अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीमध्ये झालेली साहित्य परिषद असून साहित्य भारती च्या नावाने तिचे महाराष्ट्र राज्यामध्ये काम चालते. या संस्थेच्या नूतन कार्यकारणी मध्ये निवड झालेल्या कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 
Top