तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे यांची डॉ. हेडगेवार रक्तपेढी सोलापूरच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
रक्तपेढीची 29 व्या सर्वसाधारण सभा नुकतीच दिनांक 19 रोजी संपन्न झाली. 2017 पासून ते संचालक पदावर कार्यरत असून 2025 ते 2030 या कालावधीसाठी त्यांची पुनश्च निवड करण्यात आली आहे. मराठवाड्यातून एकमेव सदस्य म्हणून 2017 पासून कार्यरत आहेत. युवास्पंदन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक रक्तदान शिबिरे घेऊन रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा करण्यामध्ये मोलाचे योगदान आहे. 1995 पासून ते रक्तदान चळवळीत सक्रिय आहेत.