उमरगा (प्रतिनिधी)- रेशीम शेती सिल्क समग्र योजना व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन लाभ मिळेल. निधीची कोणतीही कमतरता नाही. एक एकर रेशीम शेती केली तर दरमहा एक लाखाचे उत्पन्न मिळेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. तालुक्यात 500 एकर रेशीम शेती केली तर येथे कोष केंद्र सुरू करुन रेशीम कपड्यांचा उद्योग आणता येईल. असा विश्वास जिल्हाधिकारी पुजार यांनी व्यक्त केला.
जिल्हा रेशीम कार्यालय व शरण पाटील फाऊंडेशन यांच्या तर्फे शुक्रवारी दि.18 जुलै रोजी उमरगा येथे एक दिवसीय रेशीम शेती/तुती लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरुन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनोक घोष होते. यावेळी उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय शेवाळे, तहसीलदार गोविंद येरमे, रामकृष्णपंत खरोसेकर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी सौ. आरती वाकुरे, बलभिम पाटील, उमरगा बाजार समितीचे सभापती बसवराज कस्तुरे, बसवराज कारभारी, रफीक तांबोळी, मल्लिनाथ दंडगे, योगेश राठोड, सचिन पाटील, विठ्ठलसाई कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसाने, उमरगा जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित भरडे, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, राहुल हेबळे, शौकत पटेल, गणेश अंबर, भरत मारेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शरण पाटील म्हणाले की, या भागातील जास्तीत जास्त शेतकरी रेशीम उद्योगाकडे कळून उद्योगपती होऊ शकतात असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्रीराम पेठकर यांनी केले. तर सुत्रसंचलन प्रा. लक्ष्मण बिराजदार यांनी तर रफीक तांबोळी यांनी आभार मानले.