नळदुर्ग, (प्रतिनिधी)- आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी नळदुर्ग येथील बोरी धरणाच्या कालव्याच्या दुरुस्तीच्या व काँक्रिटीकरणाच्या कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून पहिल्या टप्प्यात सुमारे 14 कोटी रुपये मंजूर केले असून सध्या बोरीधरनाच्या कालव्याच्या दुरुस्तीचे व काँक्रीट करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे ,सदरील काम हे अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचे शेतकऱ्यांतून सांगण्यात येत आहे. त्यामुळे खर्च होत असलेला पैसा पाण्यात जाण्याची शक्यता असून पुन्हा शेतकऱ्यांच्या नशिबी कालव्याच्या पाझरलेल्या पाण्यामुळे शेतजमीन नापीक होण्याची शक्यता आहे, म्हणून संबंधित ठेकेदारास दर्जात्मक काम करण्यासाठी वरिष्ठांनी आदेशित करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. काम चांगले झाले तर धरणाच्या लाभक्षेत्रातील 10 गावातील सुमारे साडेतीन हजार हेक्टरला याचा फायदा होणार आहे.
आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी नळदुर्गच्या बोरीधरनाच्या कालव्याच्या दुरुस्तीच्या व काँक्रिटीकरणाच्या (अस्तरीकरण) कामासाठी पहिल्या टप्प्यासाठी म्हणून सुमारे 13 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आहे. दरम्यान याच निधीतून सध्या कालव्याचे काम सुरू झाले असून होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे, कालव्याच्या दोन्ही बाजूस रस्त्याचे काम होत असून डोंगर फोडून रस्ता करण्यात येत आहे, दरम्यान धरण बांधल्यानंतर पहिल्यांदाच कालव्याचे व वितरण व्यवस्थेचे काम होत असल्याने हे काम दर्जात्मक होणे गरजेचे आहे,धरणाच्या कालव्याच्या मुख्य द्वारापासून काही ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम झालेले आहे, सदरील झालेले काम हे निकृष्ट दर्जाचा उत्तम नमुना असल्याचे शेतकऱ्यातून सांगण्यात येत आहे, कारण होत असलेली काँक्रीटचे काम त्याची जाडी किती आहे याचा कुणालाही ठाव ठिकाणा नाही, संबंधित विभागाचे अभियंता या कामावर हजर राहत आहेत की नाही यात शंका आहे. कारण या कामाच्या काँक्रीट केलेल्या ठिकाणी काँक्रीटची जाडी ही अत्यंत कमी आहे शिवाय काँक्रिटीकरणाला मोठ्या प्रमाणात तडे गेले असून पाण्याचा योग्य प्रमाणात वापरही करण्यात आला नाही, झालेल्या कामावर दररोज पाणी मारले जात नाही, त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून हे काम थातूरमातूर केले जात आहे. त्यामुळे हे काँक्रीट केव्हाही फुटण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुन्हा कालव्याचे पाणी पाझरून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्याचे शक्यता निर्माण झाली आहे, बोरीधरणाच्या कालव्यामधून जाणारे पाणी आणि पाझरणारे पाणी यामध्ये मोठी तफावत होत असल्याने धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी शेवटपर्यंत जात नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते तर कालव्याच्या पाजणाऱ्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या नापिक बनल्या होत्या, त्यामुळे या शेतकऱ्यांना कालव्याच्या पाजणाऱ्या पाण्यापासून मुक्तता मिळावी व सगळ्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळावे म्हणून आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी बोरीधरणाच्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी व काँक्रिटीकरणाच्या दहा किलोमीटरच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 13 कोटी रुपये मंजूर केले असून त्या निधीतून सध्या कालव्याचे काम जोमाने सुरू आहे, होत असलेले काम हे अंदाज पत्रका नुसार होत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले, कारण सध्या जे कालव्याचे काँक्रीट करण्याचे काम झालेले आहे त्या काँक्रीटीकरणास मोठ्या प्रमाणात तडे गेलेले दिसून येत आहेत, एका ठिकाणी तर तडे गेले म्हणून दोन ते तीनच दिवसात संबंधित ठेकेदाराने त्या ठिकाणी झालेले काम फोडून काढून पुन्हा त्या ठिकाणी दुसरे काँक्रीट चे काम करण्यासाठी तयारी सुरू केली आहे, त्यामुळे होत असलेल्या कामात संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष घालून झालेल्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारास दर्जात्मक काम करण्याचे आदेश द्यावेत व झालेल्या कामासाठी कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.