तेर( प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री. पद्मावती मंदिरात लघु रूद्र व रूद्र स्वाहाकार विधी करण्यात आला.

आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, तेरणा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मल्हार पाटील यांच्या हस्ते लघु रूद्र अभिषेक व रूद्र स्वाहाकार विधी करण्यात आला.यावेळी सुप्रिया पाटील, जयश्री पाटील, श्री संत गोरोबा काका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्माकर फंड, उपसरपंच श्रीमंत फंड, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, भास्कर माळी, गणेश फंड,प्रा.नयना वाघ, विद्या माने, मनिषा केंद्रे, जयदेवी शिराळ, नसिम मुलांनी, मिरा जाधव व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top