धाराशिव  (प्रतिनिधी)-  धाराशिव शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या उपस्थितीतच बेशिस्त रिक्षावाले रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. समर्थ कॉर्नर येथे रिक्षा स्टॉपच्या जागेवर चहाचा रिक्षा उभा रात असल्यामुळे रस्त्याच्याकडेला रिक्षा उभ्या करून प्रवाशांची वाट पाहावे लागत आहे. 

सामान्य नागरिकांनी आपल्या दुचाकी थोडीशीही चुकीच्या ठिकाणी लावली, तर त्यांच्यावर तत्काळ दंडात्मक कारवाई होते. मात्र हेच नियम रिक्षाचालकांवर लागू होत नसल्याने, कुणाच्या आशीर्वादाने ही मोकळीक त्यांना मिळतेय? असा थेट प्रश्न आता शहरवासीय विचारू लागले आहेत.

वाहतूक पोलिसांच्या अशा ‌‘बघ्याच्या' भूमिकेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काहीजण तर असा आरोप करत आहेत की, “यामागे कोणीतरी 'साहेबांची' परवानगी असावी, म्हणूनच पोलिस गप्प बसतात.”

शहरातील चौकाचौकांत, रिक्षा स्टँडच्या जागेवर अतिक्रमण झाल्यामुळे विशेषतः बस स्टँड, समर्थ नगर कॉर्नर, भाजी मार्केट आणि बार्शी नाका परिसरात ही परिस्थिती अधिक तीव्र आहे. स्थानिक व्यापारी आणि नागरिकांच्या मते, ही वाहतूक अडचण केवळ त्रासदायक नसून आपत्कालीन परिस्थितीत गंभीर अडथळाही ठरू शकते.


 
Top