धाराशिव (प्रतिनिधी)- ईद ए मिलादुन्नबी जुलूस (पैगंबर जयंती )कमिटी 2025 धाराशिवच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक व काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खलील सय्यद यांची फेर निवड करण्यात आली आहे.

उस्मानाबाद-धाराशिव शहरात इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर हजरत मुहम्मद मुस्तफा सल्लालाहु अलैहि व सल्लम यांच्या जन्म दिना निमित्त बारा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात तसेच जयंती निमित्त अरब मस्जिद ते दर्गा पर्यंत मिरवणूक काढण्यात येते .हे सर्व कार्यक्रम आयोजित करून यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दर्गा शरीफ मध्ये शहर वासियांची दर्गा हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्ला आले या ठिकाणी बैठक घेण्यात आली अध्यक्षस्थानी मौलाना जाफर अली खान होते बैठकीची सुरवात कुराण पठणाने झाली बैठकीची प्रस्तावना व मागील वर्षीचा लेखाजोका अध्यक्ष खलील सय्यद यांनी मांडला मौलाना इस्माईल खारी ,कादर खान पठाण यांनी मार्गदर्शन केले या या वर्षीच्या जुलूस कमिटी साठी उपस्थितामधून इच्छुकांची नावे घेण्यात आली यावेळी खलील सय्यद सर ,शौकत शेख ,अजहर पठाण , इर्शाद सय्यद, आमेर वाजीद पठाण यांनी इच्छा जाहीर केली,इच्छुक पाच जण असल्याने अंतिम निर्णय समस्त मौलाना वर सोडण्यात आला मौलानानी चिठ्ठ्या टाकून निर्णय घेण्याचा निर्णय केला यावेळी खलील सय्यद सर यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने या वर्षासाठी खलील सय्यद यांची फेर निवड करण्यात आली आहे .

जुलूस कमिटी खलील प्रमाणे घोषित करण्यात आली आहे. सय्यद खलील सैफ अध्यक्ष, अजहर पठाण कार्याध्यक्ष, महमूद मुजावर उपाध्यक्ष, आमेर वाजीद पठाण उपाध्यक्ष, सय्यद इर्शाद इस्माईल उपाध्यक्ष, कलीम कुरेशी सचिव, नौमन शरशाद रजवी सहसचिव, शौकत नुरुद्दीन शेख कोषाध्यक्ष, अस्लम मुजावर सह कोषाध्यक्ष  शाहनवाज उस्मान सय्यदजादे, प्रसिद्धी प्रमुख  अरबाज नदाफ, कार्यकारी सदस्य  शेख मुज्जमील साकिबी, इस्तियाक कुरेशी, आरेफ नाईकवडी, तौफिक काझी, सय्यद शोएब, कायम निमंत्रित  मौलाना जाफर अली खान, मौलाना मोहम्मद इस्माईल, मौलाना अफजल निजामी, मौलाना इर्शाद रजा, मौलाना असलम शेख, सय्यद नादेरउल्लाह हुसेनी, कादर खान पठाण, खलिफा कुरेशी, शेख अब्दुल गफार, वाजीद पठाण, बिलाल तांबोळी, बाबा मुजावर, जाफर मुजावर, शेख रशीद लोखंडवाला. कार्यकारिणीची बैठक लवकरच घेऊन विस्तृत्व कार्यकारिणी करण्यात येईल असे खलील सय्यद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. बैठकीचे सूत्र संचालन मौलाना असलम शेख यांनी केली तर नूतन अध्यक्ष खलील सय्यद यांनी उपस्थितांचे आभार मानले.


 
Top