वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यात उपकोषगार अधिकारी (STO) म्हणून प्रभावी आणि उत्कृष्ट कार्य करणारे मोरे यांची बदली धाराशिव येथे झाल्याने त्यांना निरोप देत, सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्यकाळातील योगदानाची सर्वच स्तरांतून प्रशंसा करण्यात आली.
या कार्यक्रमात गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड, प्रफुल कुलकर्णी आणि मिसबा काजी यांनी मोरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, त्यांच्या सेवेला गौरवाचे शब्द अर्पण केले. या प्रसंगी नव्याने वाशी तालुक्यात एसटीओ म्हणून रुजू झालेल्या पत्की यांचाही स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी माजी व विद्यमान उपकोषगार अधिकाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून, दोघांनाही त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.