ढोकी (प्रतिनिधी)- पवनराजे निंबाळकर आय टी आय, कॉलेज गोवर्धनवाडी येथे कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. महेश निकुळे सर होते. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागवली आणि वीर जवानांच्या त्यागाचे, बलिदानाचे महत्त्व अधोरेखित केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामचंद्र शिंदे सर यांनी केले. यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश तिवारी लातूर विभाग अध्यक्ष, सरपंच विनोद थोडसरे, प्राचार्य बालाजी जाधव तसेच सर्व प्रशिक्षक, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top