तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील नंदगाव येथील  पांचाळ दाम्पत्यांनी  दुचाकीवरून बारा ज्योतिर्लिंग आणि सहा धाम यात्रेसाठी भारत भ्रमंती चालू आहे. सुमारे ऐकोणीस हजार किलोमीटरचा प्रवास दोन महीन्यात पुर्ण केला असुन, 8 हजार किलोमीटर राहिलेला प्रवास पंधरा ते वीस दिवसात पुर्ण करणार असल्याचे दयानंद पांचाळ यांनी सांगितले.


भगवा झेंड्यासाठी तिरुपतीत केला संघर्ष !

तिरूपती येथे गेल्यानंतर मला माझ्या गाडीवरचा भगवा तिरंगा झेडा, संताचे फोटो काढा तसा नियम असल्याचे मला येथे सांगण्यात आले. माञ मी संताचे फोटो काढतो पण माझा भगवा व तिरंगा काढत नसल्याचे ठामपणे सांगितले. तक्रार केली अखेर दीड तास नंतर मला वर सोडले.


दहा ज्योतिर्लिंग आणि दोन धाम पूर्ण केले

ऊन, वारा, पाऊस, यांची काळजी न करता हे दांपत्य दुचाकीवरून भारत भ्रमंती करत आहे. तुळजापूर तालुक्यातील नांदगाव येथील रहिवासी दयानंद पांचाळ आणि पत्नी सरोजा पांचाळ यांचा गावात फॅब्रीकेशनचा व्यवसाय आहे. या पती-पत्नीने आपल्या दुचाकीवरून बारा ज्योतिर्लिंग आणि सहा धाम दर्शनासाठी भारत भ्रमण करण्याचा निर्णय घेतला.  20 मे रोजी घरी आई-वडिलांचे दर्शन घेतले. नंतर प्रथम अचलबेट,  तुळजापूर, पंढरपूर, शिंगणापूर, जेजूरी, आळंदी, पहिलं ज्योतिर्लिंग भीमाशंकर,शनिशिंगणापूर, शिर्डी, दुसरे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर, गुजरातमधील सोमनाथ, नागेश्वर, द्वारकाधिश, राजस्थानमध्ये खाटूशाम, पंजाबमधील गुरुद्वारा, दिल्ली, उत्तराखंडमधील हरिद्वार, ऋषिकेश, प्रथम यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रिनाथ, चार धाम पूर्ण केले. आयोध्या, काशी, वाराणसी, प्रयागराज, शेगाव, कृष्णेश्वर(वेरूळ), परळी वैजनाथ, लातूर, आंध्रप्रदेशातील श्रीशैल्यम, मल्लीकार्जून, तिरुपती बालाजी, रामेश्वर, शेवट कन्याकुमारी, गोकर्णा व परत महाराष्ट्र असा त्यांचा प्रवास आहे.

आतापर्यंत दीड महिन्याच्या काळात सुमारे 19 हजार किलोमीटर प्रवास झाला असून आणखी महिनाभर भारत भ्रमण यात्रा चालणार असून यात्रा पूर्ण झाल्याशिवाय घरी परतणार नसल्याचे सरोजा पांचाळ यांनी सांगितले.

 
Top