धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्हा तेली समाज संघटना व महाराष्ट्र प्रांतिक प्रदेश तैलिक महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी समाज मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमात तेली समाजाच्या प्रगतीसाठी विचारमंथन झाले. शासनाच्या विविध योजना, समाज संघटन, शिक्षण व आरक्षणाच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली.

या वेळी माजी खासदार रामदास तडस, भूषण कर्डीले, गजानन शेलार, संजय बापू विभुते, सुनिल चौधरी, जयश बागडे, निलेश सकपाळ, पोपटराव गवळी, अतुल वांदिले, जगदीश वैद्य व धाराशिव जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

रामदास तडस यांनी सांगितले, “समाज एकत्र आल्यास सत्ता बदलवण्याची ताकद आपणात आहे. प्रांतिक महासभेच्या पाठपुराव्यामुळेच ‘संताजी जगनाडे आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन झाले, ही आपली एकजूट दाखवते.”

भूषण कर्डीले यांनी आरक्षणासाठी प्रांतिक महासभेच्या लढ्याचा उल्लेख करत, “समाजासाठी आमचा पक्ष झुंज देईल, ही वचनबद्धता आहे,” असे ठामपणे सांगितले.

संजय बापू विभुते म्हणाले, “वधूवर मेळावा जसा होतो तसा समाजकार्यासाठीही लोकांनी पुढे यावे. महिलांसाठी बचतगट व युवा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन व्हायला हवे.”

कार्यक्रमात १०वी, १२वी उत्तीर्ण व NEET मध्ये यशस्वी ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यात श्लोक राऊत (NEET AIR 712), प्रसाद घोडके, प्रार्थना घेवारे, वैष्णवी सुरवसे, समर्थ डोकडे, जान्हवी कोरे, प्रतीक्षा चिंदे, सुयश राऊत, आदित्य कोरे, प्रणाली उबाळे, प्रणाली उबाळे,भागवत प्रतिक,प्रार्थना गेवारे,ओंकार मेंगले,ओम धारवाडकर,सुरेश राऊत,संतोष शेवते,यश क्षीरसागर,अमृता चाकुरकर,यश राऊत सिध्देश्वर राऊत यांचा समावेश होता. तसेच अजित एकशिंगे यांची धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी आणि मंगेश चौरे यांची भूम-ईट शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला राजाभाऊ घोडके, ॲड. विशाल साखरे, महादेव मेंगले, संतोष कलशेट्टी, शिवानंद कलशेट्टी, मल्लिनाथ दिक्षीवंत, शिवकुमार दळवी,महादेव साखरे, राजकुमार कलशेट्टी,निर्मल कलशेट्टी,नाना कानडे,दत्तात्रय बेगमपुरे, किरण फल्ले, ओंकार मेंगले, रोहित किरवे, ओंकार कलशेट्टी, लक्ष्मण निर्मळे,प्रमोद मेंगले, प्रविण घोडके,दिपक नाईक,मुन्ना सुरवसे,अनिल कोरे, चंद्रशेखर राऊत आदींसह धाराशिव, उमरगा,भुम,कळंब,लोहारा,वाशी, तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रवि कोरे यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन दत्तात्रय बेगमपुरे यांनी मानले.


 
Top