धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रामध्ये दलित पँथरची स्थापना झाली व स्थापनेपासून दलित पँथरने समाजातील दलितावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याची व त्याचा प्रतिकार करण्याचे कार्य केले. दलित पँथरचे लढे महत्त्वपूर्ण होते. दलित पँथरच्या कार्यामध्ये मराठवाडयातील कार्यकर्त्यांचे योगदान फार महत्त्वपूर्ण व मोठया प्रमाणात राहिलेले आहे. मराठवाडयातील दलित पँथरमध्ये कार्य केलेल्या कार्यकर्त्यांची नोंद इतिहासात व्हावी. यासाठी संशोधनात्मक ग्रंथ तयार करण्याचे कार्य आम्ही हाती घेतले आहे. दलित पँथरच्या चळवळीमध्ये कार्य केलेल्या पण ज्याची इतिहासात नोंदच झाली नाही. अशा कार्यकर्त्यांनी त्यांनी दलित पँथरच्या कोणत्या लढयामध्ये सहभाग घेतला होता. ते वर्ष कारागृहात सत्याग्रही म्हणून कारावास भोगला असेल तर त्याच्या नोंदी इतर कुठल्या लढयामध्ये सहभाग घेतला असेल अशा प्रकारच्या लेखी नोंदी येणाऱ्या काळामध्ये आम्ही जमा करण्याचे ठरवले आहे. मराठवाडयातील सर्व जिल्हे व तालुक्यातील दलित पँथरच्या कार्यात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी आम्ही आवाहन केल्यानंतर स्वत: तयार केलेल्या कार्याची माहिती आमच्याकडे जमा करावी असे आवाहन त्यांनी केले. याच संशोधनात्मक कार्यासाठी धाराशिव येथे आले असता बैठकीत दलित पँथरमध्ये काम केलेले पँथर कार्यकर्ते अरुण भाऊ बनसोडे, विजय गायकवाड, दादासाहेब जेटीथोर, प्रा. रवि सुरवसे, ॲड. अजित कांबळे, अविनाश गायकवाड यांनी सुरेश वाघमारे यांचे स्वागत केले.