कळंब (प्रतिनिधी)-  आपण आयुष्यभर काम करतो, पैसा कमावतो, स्वतःचा विचार करतो, परंतु आयुष्याच्या शेवटी आपले कोणीच नसते. आयुष्यात आपण केलेले चांगले कर्मच आपल्या नंतरही आपली ओळख जिवंत ठेवते. म्हणून जीवन जगताना दुसऱ्यांसाठी काय करता येईल, आपल्यामुळे समाजातील वंचित आणि गरजू घटक कसा सुखी राहील याचा विचार करत आणि त्या पद्धतीचे कर्म करतच जीवन जगले पाहिजे. यामुळेच खरे आत्मिक समाधान लाभेल. असा संदेश प्रसिद्ध वक्ते रो.डॉ. हरिप्रसाद सोमाणी यांनी दिला. रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये ते बोलत होते.

रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचा पदग्रहण सोहळा रविवार, दि. 13 जुलै रोजी महावीर भवन येथे पार पडला. यावेळी रोटरीच्या कळंब अध्यक्षपदी डॉ.अभिजित जाधवर तर सचिव पदी शाम जाधवर यांची निवड झाली. मावळते अध्यक्ष रो.अरविंद शिंदे आणि सचिव रो.अशोक काटे यांनी आपला पदभार नवीन पदाधिकाऱ्यांकडे सोपवला. सोबतच इनरव्हील क्लब कळंबच्या अध्यक्षा म्हणून  प्रतिभा भवर यांची तर सचिवपदी डॉ. दीपाली लोंढे यांची निवड झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हरिप्रसाद सोमाणी, रोटरीचे सहप्रांतपाल  प्रदीप मुंडे यांची उपस्थिती होती. या पदग्रहण समारंभामध्ये रोटरीच्या वतीने दिला जाणारा “कळंब भूषण“ हा पुरस्कार पत्रकार तथा राजकिय विश्लेषक अभय देशपांडे यांना सन्मानपत्र, रोटरी सन्मान चिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मागच्या वर्षीचे कळंब भूषण, हायटेक इंजिनिअरिंगचे संस्थापक दिनेश वाघमारे यांनी ही व्हीलचेअर प्रसिध्द अंपग किक्रेट पटू आण्णासाहेब वाघमारे यांना भेट म्हणून दिली. या कार्यक्रमात रोटरी (पी.एच.एफ.) म्हणून डॉ. रमेश जाधवर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला रोटरी आणि इनरव्हील परिवारातील सदस्य, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, आणि निमंत्रित पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय देवडा, संजय घुले, सुशील तीर्थकर यांनी केले. तर आभार नूतन सचिव शाम जाधवर यांनी मानले.

 
Top