धाराशिव (प्रतिनिधी)- गावसूद येथील शेतजमिनीच्या वादातून दाखल गुन्ह्यातून एकाचे नाव बाहेर काढण्यासाठी तीन लाख रूपयांची लाच मागणाऱ्या हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडीही सुनावली आहे.

धाराशिव तालुक्यातील गावसूद गावात शेत जमिनीच्या बांधाच्या कारणावरून भांडण झाले होते. या प्रकरणी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये दोन भाऊ व वडील मिळून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एकाने भावाचे नाव गुन्ह्यातून वगळण्यासाठी विनंती कली होती. या प्रकरणी हवालदार मोबीन शेख याने नाव वगळण्यासाठी चार लाख रूपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीनुसार त्याने तीन लाख रूपये स्विकारण्याचे पंचासमक्ष कबुल केले होते. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्यावर मंगळवारी रात्री कारवाई केली. 

 
Top