धाराशिव (प्रतिनिधी)-स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेमुळे भारतीय जनतेत ज्यांनी जनमानसात स्वाभिमान व राष्ट्रप्रेम जागृत केले.भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली, यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले, उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले, पुढे ते म्हणाले की,

लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला. ते एक महान समाजसुधारक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशी गर्जना करून संपूर्ण देशात स्वातंत्र्याची चळवळ चेतवली.

टिळकांनी 'केसरी' आणि 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू करून जनतेमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण केली. शिवजयंती आणि गणेशोत्सव यासारखे सार्वजनिक सण सुरू करून त्यांनी समाजाला एकत्र आणले आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवली.

शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे, या विश्वासाने टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. त्यांनी 'गीतारहस्य' हे ग्रंथलेखन करून लोकांमध्ये कर्मयोगाची भावना निर्माण केली.

त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात.  त्याग, देशप्रेम, स्वाभिमान आणि एकजूट या मूल्यांची शिकवण ते आपल्याला देतात.यावेळी डॉ बालाजी गुंड, स्टाफ सेक्रेटरी वरीष्ठ विभाग हे बोलताना म्हणाले की, तरुणांनी लोकमान्य टिळकांचा आदर्श समोर ठेवून राजकीय क्षेत्रात काम करणे गरजेचे आहे,बहुजन समाज शिक्षण क्षेत्रातुन समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले,सदर प्रसंगी कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ विभागाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा सचिन चव्हाण यांनी केले तर आभार प्रा विवेकानंद चव्हाण यांनी मानले सदर प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top