उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील कोरेगावच्या सरपंच पदी अल्काबाई वैजिनाथ सूर्यवंशी यांची निवड झाल्याने भाजपचे नेते कैलास शिंदे यांनी सोमवारी त्यांचा सत्कार केला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दिग्विजय शिंदे,काँग्रेसचें माजी तालुका अध्यक्ष अडँ सुभाष राजोळे, ग्रामपंचायत अधिकारी जी. एस. बुलबुले,सोसायटीचें चेअरमन हणमंत जवळगे आदींची उपस्थिती होती.वैजिनाथ सूर्यवंशी हे गेली अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या पत्नी अल्काबाई सूर्यवंशी यांची सरपंच पदी वर्णी लागल्याने बौद्ध समाजातू त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.या वेळी शरद इंगळे,गोपाळ मोरे,गिरीजाबाई बंडगर, ओमप्रकाश इंगळे,विलास इंगळे,अशोक पाटील,केरबा सूर्यवंशी, जीवन सूर्यवंशी, बळवंत मोरे आदींची उपस्थिती होती.