जळकोट (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी (नळ) येथील रहिवासी असलेले मात्र विद्यमान स्थितीत पुणे येथे वास्तव्यास असलेले टायगर ग्रुपचे पुणे विभाग कार्याध्यक्ष अभिजीत अशोक पवार यांच्यासह त्यांचे मित्र पुणे पिंपरी चिंचवड येथील टायगर ग्रुपचे अमोल रावळकर, पुणे येथीलच युवा उद्योजक ओमकार बोरसे (पाटील) यांच्या 07 जुलै या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्यांनी यंदा तुळजापूर तालुक्यातील स्वतःची जन्मभूमी असलेल्या जळकोटवाडी (नळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व इंदिरा काळे प्रशाला, हंगरगा (नळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नंदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, होर्टी येथील जिल्हा परिषदेची केंद्रीय प्राथमिक शाळा आदी शाळेमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोठ्या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत तब्बल एक हजार छत्र्यांचे वाटप केले.
अभिजीत पवार यांनी टायगर ग्रुपच्या वतीने दरवर्षी वह्या, शालेय दप्तर आदी विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी गोरगरीब, श्रीमंत, जात, धर्म असा कोणताही भेदभाव न करता सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना शैक्षणिक हातभार लागावा त्यांचे भविष्य घडवण्यामध्ये आपला खारीचा वाटा असावा या उदात्त हेतूने त्यांनी आपली जन्मभूमी व तुळजापूर तालुक्यातील अन्य गावांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा मानस करून तो मूर्त स्वरूपात आणला जात आहे. या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन करून आभार व्यक्त केले जात आहेत.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून टायगर ग्रुपचे पुणे जिल्हाध्यक्ष अनिकेत घुले, पुणे येथील टायगर ग्रुप चे संदीप मस्के, अजय चव्हाण, आदेश सोनवणे तर टायगर ग्रुप चे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष हर्ष भरोसे, जवाहर बाल मंच चे धाराशिव जिल्हा मुख्य समन्वयक तथा लोहारा तालुक्यातील भोसगा येथील माजी सरपंच मुकेश सोनकांबळे, टायगर ग्रुप चे सदस्य अमोल सगर, राज भंडारे, कैफ बाबा जमादार, महेश बनसोडे, अभिषेक काळे उपस्थित होते.
उपरोक्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संजय रेणुके, पत्रकार मेघराज किलजे, पत्रकार विजय पिसे, पत्रकार सतीश राठोड, इंदिरा काळे प्रशालेचे मुख्याध्यापक गहिनीनाथ काळे व सर्व शिक्षक वृंद, जळकोटवाडी (नळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भोसले व शिक्षक वृंद, हंगरगा (नळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, नंदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद आदींसह विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
छत्र्या मिळाल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यांना जणू गगन ठेंगणे झाल्यासारखे दिसत होते. बालकांच्या चेहऱ्यावरील आनंदच आमचे समाधान असून असे समाधान हे लाखमोलाचे असून त्याचे वर्णन शब्दात करता येण्यासारखे नाही अशी प्रतिक्रिया याप्रसंगी टायगर ग्रुप चे अभिजीत पवार, अमोल रावळकर, ओमकार बोरसे (पाटील) यांनी व्यक्त केली. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जवाहर बाल मंच चे धाराशिव जिल्हा मुख्य समन्वयक मुकेश सोनकांबळे, टायगर ग्रुपचे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष हर्ष भरोसे, चैतन्य सगर आदींनी परिश्रम घेतले.