धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा संस्कार भारती तुळजापूर संयोजन समिती ने अविनाश धट यांच्या निवासस्थळी संस्कार भारती अनिवार्य  गुरुपोर्णिमा उत्सव आयोजित केला होता प्रथम संस्कार भारतीच्या ध्येयगीतांनी सुरुवात करुन नटराज पुजन करून यथोचित कलशात दान कलासाधकांनी सर्मपण केले. त्यानंतर कलासाधक अजय रायखेलकर, दिपक कदम, विभुते महाराज, हरिभाऊ कुलकर्णी, प्रसाद महामुनी, लोंढे महाराज यांनी भक्ती गीतांचे गायन केले त्यानंतर पोलीस अधिकारी असलेले इस्कॉन चे प्रचारक लोखंडे महाराज प्रभुजी यांनी गुरु पोर्णिमा  विषयी सत्संग करण्यात आला त्यांच्या समवेत काशीनाथ कदम , दयानिधी चैतन्यदास , शिवाजी साळुंके, समर्थ कवडे प्रभुजी उपस्थित होते. त्यानंतर संस्कार भारतीच्या वतीने गायक अजय राखेलकर , ढोलकी वादक दिपक कदम , गायक लोंढे महाराज , पेटी वादक विभुते महाराज , तबला वादक संदीप रोकडे , गीता परिवाराच्या सौ. अश्विनी अनंत कोंडो यांचा लोखंडे प्रभुजी , देवगिरी प्रांत दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ , छायाचित्र संयोजक पद्माकर मोकाशे , धाराशिव संस्कार भारती जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी , जिल्हासचिव दिपक महामुनी , जिल्हा सहकोषप्रमुख अविनाश धट जिल्हा संगीत संयोजक सुरेश वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमासाठी विराज आकाश धट ,सौ.अर्पणा शेटे ,सौ.धट , तुळजापूर संयोजन समिती प्रसाद महामुनी , आदि कला साधक यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले . शहरातील  माजी नगराध्यक्ष सुहास साळुंके, उपाध्ये मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो , पुजारी किसन कदम ,प्रा.विवेक कोरे अक्षय भन्साळी आदि प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनी युवक युवती मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन लक्ष्मीकांत सुलाखे यांनी केले तर प्रफुल्लकुमार शेटे यांनी आभार मानले उत्साहानंतर महाप्रसाद सर्वांनी घेतला .

 
Top