भूम (प्रतिनिधी)- श्री शिवाजी खरेदी विक्री संघावर बिनविरोध काढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण झाले आहे. या निवडणुकीसाठी माजी आमदार राहुल मोटे व माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमुख लढत होईल असे वाटत होते. दोन्ही पॅनलच्यावतीने एकूण 62 अर्ज दाखल झाले होते. आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी तानाजी सावंत गटाने आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. एकूण 47 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.

मागील चार वर्षापासून शिवाजी खरेदी विक्री संघाची निवडणूक झालेली नव्हती. त्यामुळे अर्ज भरण्याच्या वेळेस भरपूर प्रमाणात अर्ज आल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल असे वाटत असताना चुरशीची न होता. आज अर्ज काढून घेण्याच्या दिवशी तानाजी सावंत यांच्या गटाने अर्ज काढून घेतल्याने शिवाजी खरेदी-विक्री संघाच्या 15 जागेवर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यानंतर येथील पंचायत समिती समोर महानंदाचे संचालक रंणजीत मोटे यांच्या उपस्थिती उमेदवारासह जल्लोष साजरा केला. विधानसभा निवडणुकीच्यावेळीस बाहेरचे पार्सल बाहेर पाठवा अशा घोषणा मोटे गटांनी दिल्या होत्या. परंतु थोडक्यात पार्सल येथे राहिले अशी चर्चा या निमित्ताने चालू होते.

या निवडणुकीमध्ये सुरेश अंबादास जाधव, विजय औदुंबर बोराडे, सुरेश भागवत भोरे, रविंद्र तुकाराम पवार, प्रवीण दादासाहेब खटाळ, प्रकाश रामभाऊ शेळके, रमेश विश्वभंर मस्कर, हिरालाल मारुती ढगे,राजेंद्र ज्ञानदेव गाढवे, श्रीराम सुबराव खंडागळे, शहाजी दिगंबर दराडे, गौरीशंकर दगडू साठे, सतीश उत्तम सोन्ने ,वर्षा अशोक नलवडे ,सुधा वसंत यादव यांची बिनविरोध निवड झाली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बालाजी सावतर यांनी काम पाहिले. बिनविरोध निवड होताच येथील ओंकार चौकात फटाके फोडून व गुलाल उधळून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उस्मानाबाद डीसीसी बँकेचे उपाध्यक्ष मधुकर मोटे, माजी जि प सदस्य सुग्रीव दराडे, नानासाहेब वनवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हनुमंतराव पाटोळे, बाजार समितीचे माजी उपसभापती नामदेव नागरगोजे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितूने महत्त्वाचे असलेल्या या संस्थेवरती माजी आमदार राहुल मोटे यांचे वर्चस्व कायम राहिल्याने टायगर अभी जिंदा है असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यात निर्माण झाली आहे.

 
Top