भूम (प्रतिनिधी)-  वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांची चालू असलेल्या अमर उपोषणाच्या काल सहाव्या दिवशी जिल्हाधिकारी धाराशिव कार्यालयात झालेल्या चर्चेतही मार्ग निघाला नसल्याने आज सातव्या दिवशीही वाशीमध्ये उपोषण चालू आहे. प्रशासन आणि या भागातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी या उपोषणाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकरीवर्गात संताप व्यक्त केला जाता आहे. 

याबाबत सविस्तर असे की गेल्या सात दिवसापासून वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील वीस शेतकरी वाशी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले असून गेल्या सात दिवसापासून प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकारी यापैकी केवळ वाशी तहसीलदार व आरोग्य विभागातील कर्मचारी येऊन त्यांच्या भेटीगाठी घेतात. या व्यतिरिक्त या भागाचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार राहुल मोटे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे तानाजी पाटील यांच्या व्यतिरिक्त कोणीही या शेतकऱ्यांची भेट घेतलेली नाही. यावरून या गोष्टीचे गांभीर्य जिल्हाधिकारी धाराशिव व या भागाचे प्रतिनिधित्व करत असलेले माजी मंत्री तानाजी सावंत यांना नसल्याचे दिसून येते. सात दिवसापासून चालू असतानाही रोज शेतकऱ्यांची तब्येती कमी जास्त होत आहेत. काल जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या कार्यालयात वाशी तालुक्यातील तांदळवाडी येथील महिलांनी येऊन चर्चा केली. परंतु या चर्चेतूनही काय तोडगा निघाला नसल्याने कालची बैठकी वांजुटी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रशासनाला काही देणे घेणे असल्याचे यावरून सिद्ध होते.

 
Top