भूम (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या आजीवन शिक्षण व विस्तार विभाग अंतर्गत शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथील समाजशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. श्यामसुंदर आगे यांची कार्यक्रम अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे.

डॉ. आगे हे समाजशास्त्र विषयाचे अभ्यासू, संवेदनशील आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात ओळखले जातात. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा विचार करून त्यांची निवड झाली असून, ही महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

या नियुक्तीनिमित्ताने प्रा. डॉ. श्यामसुंदर आगे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शंकरराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

 
Top