वाशी (प्रतिनिधी)- जिल्हा प्रशासन व उत्स्फूर्त लोकसहभागातून वाशी येथे नगर पंचायतच्या वतीने सर्वे नंबर 65 नवीन पाण्याच्या टाकीजवळ राबवण्यात आलेल्या “हरित धाराशिव अभियान“ या मध्ये कॉलेज ,शाळा ,वाशी येथील मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षिका प्राचार्य,प्राध्यापक , नगर पंचायत कर्मचारी,  राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्रसेना आणि ग्रीनक्लब  यांनी वृक्षारोपण करण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 

या कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताने झाली. यावेळी वाशी नगरपंचतच्या नगराध्यक्षा विजयाताई गायकवाड, नगरपंचायत नगरसेवक नागनाथ नाईकवाडी,संतोष गायकवाड,वंदना कवडे, स्मिता गायकवाड,मुख्याधिकारी सुरेखा कांबळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम, शहरातील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी विद्यार्थींनी ,नागरिक  उपस्थित होते. यावेळी 6 हजार वृक्ष लावण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व वृक्षरोपण व संवर्धनासाठी दत्तात्रय साठे यांनी शपथ दिली तर नगरपंचायत कार्यलयाचे अधीक्षक सयाजी माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 
Top