तुळजापूर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागाचा कारभार ज्या शाषकिय कार्यालया माध्यमातून चलवला जातो ते तुळजापूर पंचायत समिती येथे असणारे स्वच्छतागृह अस्वछतेच्या विळख्यात सापडले आहे.
यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातुन कामासाठी आलेल्या तालुका वासीयांना अस्वछते मुळे स्वछता गृहाचा बाहेरचा भागाचा वापर स्वछतेसाठी करावा लागत आहे,येथील पंचायतसमिती मध्ये कामासाठी दररोज हजारो लोक दुरवरुन येतात माञ येथे पाणी पिण्यास उपलब्ध नाही स्वछतागृहाला गवताचा विळखा पडला आहे.स्वछता गृहात दारुचा बाटल्या पडल्या असुन शौचालय स्वछता केले जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे आत दुर्गधी पसरली आहे,नुतन गटविकासआधिकारी हेमंत भिंगारदेवे हे पंचायतसमिती मधील स्वछतागृहाकडे फिरकले नसल्याचे दिसत आहे. कामासाठी आलेल्या महिलांना ही येथे गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे.