धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास पाटील सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली धाराशिव शहरात “मदत नव्हे, कर्तव्य 

!“ या सामाजिक संकल्पनेतून शिवसेनेतर्फे एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. “80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण“ या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मूलमंत्र साकारत गरजू नागरिकांना हात देत शिवसैनिकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव समाजासमोर ठेवली.

धाराशिवमधील तानाजी सरपाळे यांच्या दुकानाचे पुनर्वसन युवा सेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे यांनी केले. तसेच नेताजी धोंगडे यांचे लाँड्री व्यवसाय दुकान शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाले होते. त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्याने उपजीविकेचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. त्यांनाही शिवसेना-युवासेनेतर्फे आर्थिक मदत आणि व्यवसाय उभारणीसाठी प्रत्यक्ष मदत करण्यात आली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर, विधानसभा अध्यक्ष शौकत शेख, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, युवासेना शहरप्रमुख अभिराज कदम, नगरसेवक राजाभाऊ पवार, बाळासाहेब काकडे, सिद्धेश्वर कोळी, गणेश खोचरे, तुषार निंबाळकर, देवानंद एडके, पांडुरंग माने,दीपक जाधव, मनोज पडवळ, अमित उंबरे, मनोज उंबरे, तौफिक काझी, यांचेसह शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते

 
Top