धाराशिव (प्रतिनिधी)- भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात आणि मल्हार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, धाराशिव शहरातील उद्धव ठाकरे सेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपात दाखल झाले. 

धाराशिव भाजपा कार्यालयात झालेल्या या भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमात उद्धव ठाकरे सेनेचे शहर ग्राहक संरक्षण अध्यक्ष शाहेबाज पठाण, मुजाहेद काझी, अल्लाबक्ष तांबोळी, सोहेल शेख, बिलाल चाऊस, आरेफ तांबोळी, रहीम शेख, साहिल शेख, शोएब काझी, निहाल काझी, सैफ शेख, मुजाहिद काझी यांच्यासह 40 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्ताभाऊ कुलकर्णी, तर प्रमुख उपस्थितीत मल्हार पाटील होते. व्यासपीठावर नेताजी पाटील, इंद्रजीत देवकते, ॲड. नितीन भोसले, सुनील काकडे, युवराज नळे, मधुकर तावडे, राजसिंहा राजेनिंबाळकर, संपत डोके, अभय इंगळे, अमित शिंदे, अक्षय ढोबळे, नितीन शेरखाने यांची उपस्थिती होती. पक्षप्रवेशानंतर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले की, धाराशिव नगरपालिका भाजपाच्या पूर्ण बहुमताने ताब्यात आली पाहिजे. नगराध्यक्षपद भाजपाचा गमछा घालणाऱ्या कार्यकर्त्यालाच मिळाले पाहिजे. भाजपात येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल. असे सांगितले दरम्यान, मल्हार पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, नगरपालिका निवडणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपला प्रभाग मजबूत करावा. सर्वेक्षणानंतर जनतेचा कौल पाहून उमेदवारी दिली जाईल. त्याबरोबरच जसे जनता दरबार जिल्हाभरात घेतले जात आहेत तसेच प्रभागनिहाय दरबार घेण्यात येतील. मात्र तुम्ही मेहनत करा, चांगले काम करा आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे आहोत असे स्पष्ट केले. आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि सुजितसिंह ठाकूर यांच्या विकासकेंद्रित नेतृत्वामुळे, तसेच दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या कार्यक्षम संघटन कौशल्यामुळे, उद्धव ठाकरे सेनेतील असंतोष वाढला आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते भाजपाकडे आकर्षित झाले आहेत. या पक्षप्रवेशामुळे धाराशिवच्या राजकारणात भाजपाची ताकद आणखी मजबूत झाली असून, आगामी नगरपालिका निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या कार्यक्रमाला फरहान काझी, आरिफ पठाण, प्रा. पटेल, मेहमूद मुजावर, जाकीर पठाण, फहाद सिद्दिकी, फिरोज पठाण, रय्यान रझवी, रमजान तांबोळी, तौफिक मुजावर, कावेर शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top