तुळजापूर (प्रतिनिधी)-  केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जात असताना त्यांनी तुळजापुरात थांबून श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.  देवीच्या चरणी नतमस्तक होत देशवासियांसाठी सुख, समृद्धी आणि आरोग्य यासाठी प्रार्थना केली.

मंदिर संस्थानच्या वतीने मंत्री प्रतापराव जाधव यांचे देवीची प्रतिमा देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले आणि रामेश्वर वाले, जनसंपर्क अधिकारी गणेश निर्वळ, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, दीपक शेळके आणि मंदिर संस्थानचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top