नळदुर्ग (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील 11 व कर्नाटकातील एक असे एकूण बारा किल्ल्यास जागतिक वारसा यादीत समावेश केला असल्याने माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी साखर वाटप करुन आनंद उत्सव साजरा केला.

नुकत्याच जाहिर केलेल्या युनोस्कोने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्याचा जागतिक वारसा यादीत सहभाग जाहिर केला आहे. ही बाब संपूर्ण देशासाठी अभिमानाची आणि गौरवास्पद आहे.

नळदुर्ग शहरात माजी नगरसेवक व ब्राह्मण समाज संघटनेचे अध्यक्ष तथा शिवप्रेमी विनायक अहंकारी यांनी मुख्य बाजारपेठेतते हालगीच्या निनादत शहरात साखर वाटप केली. नळदुर्ग शहरामध्ये शिवरायांचा इतिहास लोकांपर्यंत पोहंचवण्याचा प्रत्यन विनायक अहंकारी हे सातत्याने करत असतात. शिवजयंती निमित्त स्वतःच्या घरात शिवजन्म पाळणा सुरु करुन विनायक अहंकारी यांनी एक नवा आदर्श उभा केला आहे. अशा अनेक सामाजिक कार्यात त्यांनी नळदुर्ग शहरासाठी एक आदर्श निर्माण केले आहे. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांचे आभार व्यक्त केले आहे. अशा प्रकारे आनंद व्यक्त करणारे विनायक अहंकारी हे एकमेव व्यक्ती आहेत.

 
Top