तेर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे घेतली जाणारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी मध्ये धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.

शिष्यवृत्ती  परीक्षेमध्ये विद्यालयातून तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले. अनन्या अविनाश पाडुळे, दिव्या रामचंद्र आगलावे, विजय धनंजय साळुंके हे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी, विद्यार्थीनी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जे. के.बेदरे, पर्यवेक्षक एस .एस.बळवंतराव, बी. डी.कांबळे, एल. टी.चव्हाण,  एम. एल.कांबळे, एम. एन.शितोळे, ए. एन. रणदिवे, एस. टी.कोळी, एस. डी.घाडगे, एस. यु.गोडगे, ए. बी.नितळीकर, एस. बी.पाटील, व्ही. एम.भंडारे , आर. एम.साखरे आदी उपस्थित होते.

 
Top