भूम (प्रतिनिधी)- माजी सैनिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था भूम तालुकच्या वतीने 26 जुलै कारगिल विजय दिवस येथील यश मंगल कार्यालय येथे साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाचे 4 थे वर्ष आहे. यावेळी अध्यक्ष भारतीय जवान किसान राष्ट्राध्यक्ष नारायण अंकुश हे अध्यक्षस्थानी होते. तसेच माजी मुख्याध्यापक भीमराव बाबुराव घुले, विजयसिंह थोरात, तालुक्याचे पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे .प्रथम नारायण अंकुश, संघटना अध्यक्ष हेमंत देशमुख, सचिव प्रभाकर, ग्रामीण कार्याध्यक्ष प्रल्हादजी कुटे साहेब, यांच्या कडून रीथ ड्रिल करून शहीद जवानांना रिथ (पुष्पगुच्छ) अर्पण करण्यात आले. नंतर मान्यवराच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नंतर कारगिल युद्धात शहीद जवानांना उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहीद जवानांच्या वीरपत्नी यांचा शाल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व पाहुण्यांचा शाल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सूत्रसंचालन अलीम सर यांनी केले या कार्यात अध्यक्ष हेमंत देशमुख, सचिव प्रभाकर हाके, कार्याध्यक्ष पोपटराव जाधव, कोषाध्यक्ष दादाराव जाधव,ॲड.भगवान नागरगोजे, दत्तात्रय गिलबिले, मधुकर वाघमोडे ,सुदाम शेलार, राजाभाऊ भोरे, शिवाजी चव्हाण, प्रल्हाद कुटेसाहेब, बाळासाहेब जाधव,नामदेव माने. प्रभाकर औताडे,प्रमोद जाधव, ईट सर्कलचे कार्याध्यक्ष दिलीप भोसले, प्रभाकर वरबडे यासह संघटनेतील तालुक्यातील सर्व माजी सैनिकांनी सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी केला सर्वांचे धन्यवाद.