धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे जनतेचे प्रतिनिधी, सेवाभावी आणि कर्तव्यदक्ष खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा वाढदिवस यंदाही समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा करण्यात आला. 'नेतृत्व हे केवळ पद नसून सेवा' हे तत्त्व पाळत राजेनिंबाळकर यांच्या कार्यशैलीला अनुसरून शिवसेना व युवासेनेच्या वतीने विविध उपक्रमांची प्रभावी रचना करण्यात आली.

धाराशिव शहरातील खासदार संपर्क कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरास नागरिक, तरुण, कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्याने वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन केले गेले. अनेकांनी 'वाढदिवसाचा खरा अर्थ समाजासाठी योगदान' या भावनेतून रक्तदान केले.

त्यानंतर धाराशिव येथील अंकुर शिशूगृहातील निराश्रित मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी धाराशिव-कळंब विधानसभा अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्या हस्ते संस्थेला 21 हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. या उपक्रमात माणुसकीचा जिव्हाळा प्रकर्षाने जाणवला. या दिवशी धाराशिवच्या शासकीय स्त्री रुग्णालयात 17 जुलै रोजी जन्मलेल्या बालकांना खास ड्रेस देण्यात आले. त्यांच्या मातांना साडी-चोळी आणि खाऊ वाटण्यात आले. मातृत्वाचा सन्मान आणि नवजात बालकांचा आनंद या उपक्रमात प्रतिबिंबित झाला.

या सर्व कार्यक्रमांमध्ये शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख विजय सस्ते, जिल्हा सचिव प्रविण कोकाटे, युवासेना जिल्हाप्रमुख रवि वाघमारे, जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर, धाराशिव शहरप्रमुख सोमनाथ गुरव,अतिश पाटील, युवासेना तालुका प्रमुख राकेश सुर्यवंशी, नगरसेवक बाळासाहेब काकडे, रोहित निंबाळकर,तुषार निंबाळकर, सिध्देश्वर कोळी,राणा बनसोडे, रवि कोरे आळणीकर,निलेश शिंदे, सुनिल वाघ, युवासेना शहरप्रमुख अभिजित कदम, उपशहरप्रमुख बंडू आदरकर,दिपक जाधव,जावेद काझी, विधान सभा अध्यक्ष शौकत शेख,मनोज उंबरे,अकबर कुरेशी, अमित उंबरे, ॲड. मनोज शेरकर, मिलिंद पेठे,नाना घाटगे,पंकज पडवळ,गणेश साळुंखे, अविनाश शेरखाने, सतिश लोंढे,मुजीब काझी,पांडू भोसले, हनुमंत देवकते,संकेत सुर्यवंशी, नवज्योत शिंगाडे,साबेर सय्यद,कलीम कुरेशी,शिवराज आचार्य,अशोक पेठे,मोईन पठाण, पांडूरंग माने,राज निकम,कालिदास शेरकर,पिंटू अंबेकर,अक्षय जोगदंड, नितिन राठोड,सुयोग शिंदे,लाला पवार,गफूर शेख,बिलाल कुरेशी, प्रदिप साळुंखे, प्रविण शेंदारकर,महेश लिमये, रवि वाघमारे,बबलू कोकाटे,यशवंत शहपालक,सात्विक दंडनाईक,अभिजित साठे, यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी आदींचा समावेश होता. 

 
Top