भूम (प्रतिनिधी)- सालाबाद प्रमाणे याही वर्षे भूम शहरातील शासकीय विश्रामगृहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती उत्सव समितीची बैठक घेण्यात आली. बैठक ही गौरीशंकर दगडू साठे यांच्या अध्यक्षतेखालील बैठक पार पाडली.
यावेळी मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम साजरे करण्याचा ठराव संमत करण्यात आला यामध्ये अन्नधान्य वाटप, रक्तदान शिबीर, गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर वाटप ,वृक्षारोपण , आदि कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
या बैठकी मध्ये सर्वानुमते अध्यक्ष पदी प्रदीप अनंत साठे , उपाध्यक्ष पदी सचिन महादेव साठे, कोषाध्यक्ष पदी नितीन पांडुरंग साठे, सचिव पदी गणेश भाऊराव साठे यांची निवड करण्यात आली .या बैठकीस गणेश गौरीशंकर साठे, राजु सर्जेराव साठे, प्रशांत अनंत साठे, साठे, नितीन साठे, हरी भगवान लोंढे, ओंम गणेश साठे, अभिजित साठे, अकाश साठे, लखन साठे, अभिमान श्रीरंग साठे, सागर गायकवाड, अजित गायकवाड , आदि समाजबांधव उपस्थित होते.