तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील हडको भागात शुक्रवार दि. 25 जुलै रोजी पहाटे चोरट्यांंनी घर फोडण्याचा प्रयत्न केला. माञ असफल ठरल्याने तात्काळ येथून त्यांनी पळ काढला.
शहरातील हडको भागात श्रीकृष्ण बाळासाहेब दीक्षित यांचे निवास स्थान असून ते वास्तव्यास बाहेर गावी असतात ही संधी शाधत शुक्रवार अंदाजे पहाटे 04:30 दरम्यान काही अनओळखी व्यक्ती गाडीत येऊन श्रीकृष्ण दीक्षित यांच्या घराचा दरवाजाचा लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. माञ तो असफल ठरल्याने चोरी घटना टळली. या प्रकरणी विशाल कोंडो यांनी या घटनेची तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली.