तुळजापूर (प्रतिनिधी)- कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथील भाविक चंद्रशेखर गुरुनाथराव सुत्रावे यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी आपली भक्ती प्रकट करत देवींच्या चरणी सोनी कंपनीचे 55 इंची 2 एलईडी टीव्ही अर्पण केले. या टीव्हीचे लोकार्पण श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या हस्ते पार पडले.

चंद्रशेखर सुत्रावे यांनी देवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत हे टीव्ही अर्पण केले. हे टीव्ही मंदिर प्रशासनाच्या विविध सेवांमध्ये, विशेषतः दर्शन व्यवस्थापन, माहितीप्रसारण आणि श्रद्धाळूंना उपयुक्त सूचना देण्यासाठी वापरले जाणार आहेत. भाविक चंद्रशेखर सुत्रावे यांचे हे कार्य इतर भक्तांसाठीही प्रेरणादायी ठरेल. मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. तुळजाभवानी मातेच्या भक्ती परंपरेला समर्पित असे हे दान मंदिराच्या सेवा-सुविधा विस्तारासाठी उपयुक्त ठरेल.

 
Top