धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यातील सर्व बिअर बार 14 जुलै रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाने मद्याच्या एमआरपीमध्ये वाढ केल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती धाराशिव जिल्हा परमिट रूम असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संपतराव डोके यांनी दिली.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या निर्णयाचा परिणाम दिसून येणार असून धाराशिव जिल्ह्यातील सर्व परवानाधारक बिअर बार हॉटेल्स या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शासनाने बिअर बार व्यापाऱ्यांशी सल्लामसलत न करता दरवाढ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संपतराव डोके यांनी सांगितले की, “आमच्यावर आधीच विविध कर, भाडे आणि नियमांचे ओझे आहे. आता दरवाढ केल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होणार आहे व व्यवसायावर परिणाम होणार आहे.“व्यापाऱ्यांनी सरकारकडे दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे, अन्यथा पुढील काळात राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या बैठकीला राजाभाऊ आवटे, सुभाष शेट्टी, निलेश भोसले, अजय सुर्यवंशी, बालाजी घोगरे, धनराज डोलारे, राजेंद्र घुले, अमरजित बारकुल, प्रशांत बारकुल, समाधान बारकुल, गौस मोमीन यांचेसह जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

 
Top