भूम  (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील श्री क्षेत्र सामनगाव येथे मोठ्या शिष्य गणांच्या उपस्थितीत भव्य दिव्य गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न झाला.

सामनगाव मध्ये सकाळपासूनच शिष्यगण गर्दी पहावयास मिळत होती. सकाळी 9 ते 10 समाधीस अभिषेक करण्यात आला. नंतर 10 ते 12 कालावधीमध्ये हरी कीर्तनकार हभप सोमनाथ महाराज कराळे पैठण यांचे किर्तन झाले. पाटसांगवी ते श्री क्षेत्र सामनगाव (जुने) पायी दिंडी सोहळा संपन्न झाला. नंतर शिष्य गणांच्या उपस्थितीमध्ये गुरुपूजन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर हभप वै रामलिंग इंदलकर यांच्या स्मरणार्थ डॉ. संतोष रामलिंग इंदलकर यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत भजन होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी हभप धर्मादास महाराज, हभप रवी महाराज, सर्जेराव इंदलकर, दादासाहेब दळवी यांच्यासह महिला शिक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती .यावेळी पंचक्रोशीतील शिष्य गण उपस्थित होते.

 
Top