भूम (प्रतिनिधी)- गोरक्षकच्या नावाखाली विना नंबर प्लेटच्या गाड्या घेऊन त्या गाड्याला महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावला जातोय हे काल भूमच्या घडलेल्या जनावरे वाहतूक प्रकरणात नागरिकांना दिसून आले आहे. मात्र या संदर्भात भूम पोलिसांकडून कुठलाच खुलासा करण्यात आलेला नाही.

दिनांक 13 जुलै च्या पहाटे भूम ते पार्टी रोड या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील मानेगाव तालुका माढा येथील काही गोरक्षक युवकांनी गाड्यांचा पाठलाग करून दोन गाड्या अडवल्या आणि पोलिसांना खबर करून त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या या घटनेमध्ये प्रामुख्याने गौरक्षक यांनी  घटनेत मुख्यत्वे महिंद्रा कंपनीची विना नंबर प्लेट असलेली बोलेरो गाडी आणि स्विफ्ट कंपनीची गाडी यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, काही नागरिकांना या गाड्यांवर महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावलेला दिसला. यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि प्रश्नांची उबळ वाढली आहे.

गोरक्षकांनी अथवा त्या गाड्यांच्या चालकांनी महाराष्ट्र शासनाची पाटी का वापरली याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही. भूम पोलिसांनी यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण दिलेले नसल्याने नागरिकांमध्ये विविध शंका उपस्थित झाल्या आहेत.

या घटनेमुळे सुरक्षेच्या दृष्टीने एक भयंकर संकेत मिळतो. विना नंबर प्लेटच्या गाड्या आणि त्यांवर सार्वजनिक संस्थांचे बोर्ड लावणे हे किती गंभीर आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करणे अत्यंत महत्त्वाचे होते, जेणेकरून नागरीकांचा विश्वास पुनर्संचयित होईल.

  यासंदर्भात भूम पोलिसांकडूनही कुठलीच कारवाही किंवा विचारपूस झाल्याचे दिसून येत नसल्याने लोकांमध्ये विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. नेमके विना नंबर प्लेट वाहन घेऊन फिरणारे हे गोरक्षकच असतील हे कशावरून समजावे किंवा एखादी घटना घडली तर ही गोरक्षक च्या नावाने लादली जाणार की दरोडखोराच्या नावाने लादली जाणार असा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे. 

विना नंबर प्लेट आणि नंबर प्लेट वरचा नंबर न दिसणारा सारख्या गाड्या युवकांनी वापरल्या असताना यासंदर्भात भूम पोलिसांनी चौकशी करणे अपेक्षित असताना असे न करता भूम पोलिसांनी या युवकांना मुभा का दिली असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे खरंच मुभा दिली आहे की शाबासकी दिली आहे हे लोकांना कळणे अपेक्षित असताना पोलिसांकडून मात्र हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

गोरक्षक आणि खरोखरच चांगले कार्य केले असेल तर त्यांचं कौतुक होणे साहजिकच आहे. परंतु नियमाचे भंग करून जर गोरक्षक वागत असतील आणि त्याला जर पोलीस सहकार्य करत असतील तर खरंच कायदा नियमात वापरला जातोय का हा प्रश्न निर्माण झाला आहे. या सदर्भात सुद्धा धाराशिव जिल्ह्याचे  पोलीस अधीक्षक श्रीमती रीतू खोकर यांनी याबाबत सखोल चौकशी करून असा प्रकार घडत असेल तर त्याला कोणी दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी नागरिकांमधून चर्चा ऐकावयास मिळत आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top