(मुरुम प्रतिनिधी)- शहर व परिसरात विश्वासार्हतेचा लौकिक कमावलेल्या व्यापारी नागरी सहकारी म. पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात मंगळवारी (ता. 8 ) रोजी पार पडली 1995 पासून सुरू असलेल्या बिनविरोध निवडीच्या परंपरेला यंदाही कायम ठेवत संस्थेच्या सभासदांनी एकतेचा परिचय दिला.
यावेळी अध्यक्षपदी उमेश कारभारी, उपाध्यक्ष अशोक चव्हाण तर सचिव श्रीकांत मिणियार यांची निवड करण्यात आली. संचालक मंडळात शशिकांत बाबशेट्टी, अंबाजी बिराजदार, सुरेश रणसुरे, प्रवीण सोलापुरे, दत्तात्रय गिरीबा, महानंदा ख्याडे, प्रेमा झंवर यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालकांचे व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व सभासद, शहर व परिसरातील नागरिकांनी हार्दिक अभिनंदन केले. याप्रसंगी श्रीकांत मिणियार म्हणाले की, व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचा मुख्य उद्देश सभासदांसह व्यापाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे. सभासदांचा विश्वास व पारदर्शक कारभारामुळे भविष्यात संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक कर्ज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. व्यापाऱ्यांना विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यावर संचालक मंडळ कटिबद्ध राहील. सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाचे आम्ही नेहमी ऋणी आहोत. हा खंबीर विश्वास पाठीशी घेऊन संस्था अधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन त्यांनी शेवटी दिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एम. कातपुरे यांनी पारदर्शकपणे जबाबदारी सांभाळली. सिद्रामप्पा तूगावे, राजकुमार स्वामी, मनोज व्हसाकले, संजय टिकांबरे, आर. व्ही. स्वामी आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धू स्वामी यांनी केले. सूत्रसंचालन राजकुमार स्वामी तर आभार मेघराज धुमुरे यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने सभासद, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.