भूम (प्रतिनिधी)- अनेक महिन्यांपासून रखडलेले सरपंचांचे मानधन तात्काळ मिळावे तसेच मानधनांमध्ये दुप्पट वाढ करण्यात यावी यासाठी सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र या संघटनेमार्फत राज्य सरकार
यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानतंर अखेर मानधनात वाढ आणि थकीत मानधन मिळाल्यानतंर तालुक्यातील सरपंचांच्या वतीने महिला प्रदेशाध्यक्षा जिनत सय्यद यांचा सत्कार करण्यात आला.
सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र या संघटनेतर्फे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारकडे सरपंचांना मानधन वाढवून मिळावे व प्रलंबित मानधन तात्काळ जमा करण्यात यावे अशी मागणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली होती. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानतंर मागणी मान्य झाल्यानंतर भूम पंचायत समिती सभागृहात सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आंदोत्सव साजरा करत प्रदेशाध्यक्षा जिनत सय्यद यांचा सत्कार करण्यात आला.
भूम येथे सरपंच परिषदेच्या वतीने पंचायत समिती प्राणंगणामध्ये पेढे वाटून आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला आहे. याप्रसंगी
राज्य संघटक कोहिनूर सय्यद,मराठवाडा विभाग उपाध्यक्ष तानाजी पाटील,जिल्हा संघटक बालाजी कुटे,जिल्हा सचिव सुभाष देवकते,खरेदी-विक्री संघ व्हा.चेअरमन श्रीराम खंडागळे,सरपंच महेंद्र गायकवाड,अमोल मासाळ,भास्कर खोगरे, बप्पासाहेब बोराडे,पांडुरंग देऊळकर,अतुल शेळके,तात्या ठोंबरे, अलीम सर, शिवसेना माजी शहर प्रमुख दीपक मुळे, शिवसेना विधानसभा प्रमुखप्रल्हाद अडगळे,भैय्या बोराडे, पुरुषोत्तम बांगर, अविनाश चोरमले,मल्हार चोरमले, गौतम वरले आदी पदाधिकारी उपस्थित होते.