भूम (प्रतिनिधी)- भूम येथील आर्या महेश होनराव हिने नेट युजी 2025 या परीक्षेमध्ये घवघवीत संपादन केल्याबद्दल राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरच्या वतीने सत्कार करण्यात आला.

नीट युजी 2025 परीक्षेत आर्या होनराव हिने 700 पैकी . 565 मार्क घेऊन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल राजर्षी शाहू महाविद्यालयात एम्स बॅचेचे समन्वयक जरीटाकळीकर ,सीईटी सेल चे संचालक डी के देशमुख आणि तलवारे यांनी आर्या होनराव हिचा ट्रॉफी प्रमाणपत्र सत्कार करण्यात आला .यावेळी महेश होनराव ,गुरुलिंग होनराव ,मेघा होनराव, उमा होनराव आदी यावेळी उपस्थित होते.


 
Top