धाराशिव (प्रतिनिधी)- प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री, शेतकरी, कामगार, दिव्यांग व सामान्य जनतेचे बुलंद प्रतिनिधित्व करणारे नेते  श्री. बच्चुभाऊ उर्फ ओमप्रकाश बाबाराव कडू यांचा वाढदिवस दिनांक ५ जुलै २०२५ रोजी अत्यंत साधेपणाने, कोणतीही जाहिरातबाजी,अतिशबाजी, बॅनरबाजी न करता साजरा करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालय, धाराशिव येथे फळ वाटप व गरजूंना अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शासकीय सार्वजनिक रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत अन्नपूर्णा मंडळाचे संचालक अजमेरा साहेब यांची विशेष उपस्थिती होती.

या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आदरणीय बच्चूभाऊंनी नेहमीप्रमाणे लोकसेवा हीच खरी सेवा असल्याचा संदेश दिला. गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्याचा हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी ठरला. प्रहार दिव्यांग क्रांती व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात वाढदिवस सामाजिक कार्याच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार हा कार्यक्रम राबविण्यात आला. सदर कार्यक्रम प्रहार चे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या नेतृत्वाखाली,जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष जमीर शेख,संजय नाईकवाडी,दिनेश पोद्दार,इंद्रजीत मिसाळ,नवनाथ कचार,धनंजय खांडेकर,शिवकुमार माने,प्रकाश खडके,चांगदेव चौधरी यांच्या परिश्रमातून यशस्वीरीत्या पार पडला.

 
Top