राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा धाराशिवच्यावतीने सामाजिक उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (दि.22) जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांच्या वतीने स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह आळणी येथे फळ, खाऊचे वाटप. तसेच वृक्ष लागवड करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे  यांनी शिक्षक,कर्मचारी यांच्याशी संवाद साधून संस्थेच्या अडीअडचणी बद्दल माहिती घेतली. जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, येणाऱ्या पुढील काळामध्ये या बालगृहासाठी आपल्या पक्षाच्या वतीने नक्कीच मोठे काम करण्याचे आश्वासन दिले. वाढदिवसाचे निमित्त साधत बालगृहातील मतिमंद मुलींच्या वतीने एक गीत गायले. बालगृहातील मुलीं, सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी यांनी दादांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून पुढील राजकीय भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस धाराशिव जिल्हा भरामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते व अजित दादा प्रेमी यांच्या वतीने सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात  करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्यासोबत  जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दीन मशायक, प्रदेश संघटक सचिव खलील पठाण, धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, धाराशिव शहर अध्यक्ष सचिन तावडे, धाराशिव शहर कार्याध्यक्ष मनोज मुदगल, अकबर खान पठाण, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, बंजारा सेल जिल्हाध्यक्ष सुरेश राठोड, सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अराफत काझी, मुरलीधर इंगळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top