तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील कृषि उत्पन्न बाजार समिती,तुळजापूरचे हेडप्यून श्री सिध्देश्वर बाबुराव साळुंके हे नियत शासकीय वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यांना आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के, माजी सभापती विजय गंगणे, उपसभापती सुहास गायकवाड, संचालक दिपक आलुरे, विजय शिंगाडे, सिध्देश्वर कोरे, सुनिल जाधव, बालाजी रोचकरी, संतोष कदम, दत्तात्रय वाघमारे, बाजार समितीचे सचिव उमेश भोपळे, लेखाधिकारी शिवानंद राठोड, प्रमोद पडवळ, नागेश देशमुख, सुनिल लोमटे, लिंबाजी सरडे यांचेसह व्यापारी, हमाल इ.उपस्थित होते.


 
Top