तुळजापूर (प्रतिनिधी)- ड्रग्ज प्रकरणातील फरारी आरोपी 15 आँगस्ट पकडा. खऱ्या आरोपीना मोका लावा. मी येणार म्हटले कि एखादा आरोपी पकडला हे योग्य नाही. तिर्थक्षेञ तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरण राज्याचा नकाशा वरुन देशाचा नकाशापर्यत पोहचल्याचे सांगुन, चार-पाच महिने झाले तरीही 13 आरोपी सापडत नाहीत. ते काय परदेशात पळुन गेले का? असा सवाल करीत ड्रग्ज समुळ नायनाट केल्या शिवाय मी शांत बसणार नसल्याचे प्रतिपादन पालकमंञी प्रताप सरनाईक यांनी केले. पालकमंत्री तथा परिवहन मंञी प्रताप सरनाईक यांनी रविवारी सहकुटुंब श्रीतुळजाभवानी दर्शन घेतल्यानंतर पञकारांशी बोलत होते.
यावेळी बोलताना पुढे म्हणाले कि, शिवसेनेचे मंञी जे वादात सापडत आहेत त्यांना आमचे नेते तथा उपमुखमंञी एकनाथ शिंदे यांनी सुचना केली आहे. चुकीच्या पध्दतीने वागणे अयोग्य आहे. या विषयावर मला जास्त बोलायला लावु नका. भविष्यात अशा चुका करु नका कि ज्यामुळे याचे परिणाम पक्षाला व मला भोगावे लागतील. अशा सुचना दिल्याची माहीती पालकमंत्री यांनी दिली.
तेव्हा पळ काढला
उमरगा शिवसेना उबाटा आमदर स्वामी भेटी बाबतीत हे आँपरेशन टायगर आहे का असे विचारले असता तसे काही नसल्याचे सांगुन, जिल्हा शांत राहावा, विकास करावा, यासाठी एकञित काम केले. तर काय हरकत आहे, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस व आदित्य ठाकरे भेटी बाबतीत पालकमंत्री म्हणाले कि, महायुतीला गरज होती तेव्हा पळ काढला. सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री यांना कामाबाबतीत भेटणे संधीसाधु कोण आहेत या बाबतीत मुख्यमंञ्यांना कल्पना असते. कुणाला कधी संधी द्यायची हे मुख्यमंत्री यांना कळते. महायुतीकडे 237 आमदार आहेत. सरकार स्ट्राँग मजबुत आहे असे यावेळी म्हणाले.
गुवाहाटीला खुली चर्चा केली नाही
कृषी मंञी कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. या बद्दल बोलताना हसत सरनाईक म्हणाले की, अमीर खान, शाहरुख खान मोबाईलवर रमी खळतोच कि, रमी चांगला खेळ आहे म्हणून टीव्हीवाल्यांनी दाखवला असेल असे यावेळी म्हणाले.
बहुमत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना आँफर का दिली. या प्रश्नाला उत्तर देताना सरनाईक म्हणाले कि, खुले बोलले म्हणून मनावर घ्यायचे नसते. याचा वापर राजकारणासाठी केला जातो. आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा खुली चर्चा केली नव्हती. असे म्हणत यावर स्पष्ट बोलणे टाळले.