तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे व राष्ट्रीय सुगी पाश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती आणि संचालक मंडळ तसेच सचिव यांची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा धाराशिव येथे 17/6/2025रोजी संपन्न झाली
त्यापूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठेधाराशिव, बाबासाहेब वीर जिल्हा कृषी उपसंचालक धाराशिव उपसरव्यवस्थापक महादेव बर्डे धाराशिव तसेच डीएमआयचे सोनाली बागडे राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था संस्थेचे अमोल भोंग शशिकांत भरणे महेश जगतापअवधूत तांबे यांची उपस्थिती होती.
या कार्यशाळेत जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे गुणवत्ता वाढवावी व पायाभूत सुविधाचे बळकटीकरण करावे.यासाठी आव्हान केले. कृषी उपसंचालक बाबासाहेब वीर यांनी कृषी उत्पादने वाढवण्यासंदर्भात योजना यासंदर्भात मार्गदर्शन केले. केंद्र शासनाच्या डीएमआयचे श्रीमती सुनिता बागडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व शेतकरी यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली तसेच श्री महादेव बरडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांनी बाजार समिती समोरील भविष्यातील आव्हाने व उपाय योजना याविषयी माहिती दिली. आज रोजी झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये एकूण 08 बाजार समिती 95 प्रशिक्षणार्थी सहभागी झालेले होते.