धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये इ ५ वी ते पुढे नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ  व पाठयपुस्तक देऊन  प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे व मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात  आले .

 नवीन वर्ग , नवीन पाठयपुस्तक , नवीन मित्र या भारावलेल्या वातावरणात मुलांनी शाळेत प्रवेश केला ,राष्ट्रगीत राज्यगीतानंतर प्राचार्यांनी विदयार्थी , पर्यवेक्षक , शिक्षक , पालक यांना पुष्पगुच्छ देऊन शैक्षणिक वर्ष २०२५ २६ वर्षासाठी .यावेळी उपमुख्याध्यापक प्रमोद कदम , पर्यवेक्षक यशवंत इंगळे , सुनील कोरडे , श्रीमती बी .बी . गुंड , राजेंद्र जाधव , निखील गोरे , धनंजय देशमुख सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी , पालक उपस्थित होते .

 
Top